Skip to main content

वंजारी ही महाराष्ट्रातील हिन्दू धर्मातील एक जात.

वंजारी ही महाराष्ट्रातील हिन्दू धर्मातील एक जात आहे. सुमारे चारशे वर्षापुर्वी या समाजाने राजस्थानातुन येथे स्थलांतर केले. हा समाज मुख्यतः महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक गुजरात मध्यप्रदेश उत्तरप्रदेश छातीस्गड राजस्तान हरियाना पंजाब जम्मू काश्मीर व गोवा या भागांत कमी जास्त लोक्संखेने पसरलेल्या या जातीतील लोक प्रमुख ४ पोट जातीत विभागल्या मुळे एकता नसलेला पण भारतातील एक प्रमुख क्षत्रिय भटका समाज. भारतात व अन्य देशांतही आढळतो. वंजारी समाज हा महाराष्ट्र गुजरात मध्यप्रदेश उत्तरप्रदेश छातीस्गड राजस्तान हरियाना पंजाब जम्मू काश्मीर या राज्जात कमी जास्त लोक्संखेने आणि प्रमुख ४ पोट जातीत विभागल्या मुळे एकता नसलेला पण भारतातील एक प्रमुख क्षत्रिय भटका समाज.

 वंजारी समाजाचा त्यागाचा शौर्य पराक्रमाचा इतिहास आहे वंजारी समाज हा क्षत्रिय वंश असेलेला पण देशोदेशी भटकंती करणारा बलशाली व कडवट लढाऊ गट आहे .महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा औरंगजेब भेटी वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वताच्या सोबत निवडक लोकांमध्ये वंजारी लोक निवडण्याचे कारणही हेच कि वंजारी समाज हा क्षत्रिय बलशाली व कडवट लढाऊ बाण्याचा आहे .तसेच राष्ट्रमाता जिजाऊ मां साहेबांच्या माहेरगावी शिंदखेड राजा परिसरातील हजारो वंजारी तरुण मावळे शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सहभागी होते . तसेच राजस्तानात महाराणा प्रताप जेव्हा दिलीच्या पातशहा सोबत एकाकी लढत होते तेव्हाही हाच वंजारी समाज तेथे आपले शौर्य पराक्रमाचा इतिहास उभारत होता कारण महाराणा प्रताप यांचे प्रमुख सरदार मल्ला व फत्ता वंजारी हे निष्ठेने लढत होते त्यांच्या समाध्या उदयपुर किल्ल्यात आजही उभ्या आहेत. वंजारी हा क्षत्रिय वंश असेलेला महाराणी दुर्गावती १० लाख बैल वापरून संपूर्ण भारतात विविध राजांना युद्धात दारुगोळा शात्स्त्रात व मीठ मसाला आनाधान्न्य पुरवठा करत आसे. क्षत्रिय वंश असेलेला पण देशोदेशी भटकंती करणारा वंजारी समाज हा तत्कालीन समाज धुरिणांनी भटका या बिरुदाने बाजूला टाकला व काळाच्या ओघात आपली मूळ ओळख विसरून एक उपेक्षित समाज म्हणून पुढे चालत गेला. आणि आजही उपेक्षित राहिला आहे 

  आजचे घाट, रस्ते हे मुळच्या वंजारी मार्गांवरच बनले आहेत. या मार्गांवरुन एकेक वंजारी कुटुंब शेकडो बैलांचे तांडे घेवून देशभर मालवाहतुक करत असत. वाटेत चोर-दरोडेखोरांच्या धाडी पडण्याच्या घटना नित्य असल्याने प्रतिकारासाठी मूळचाच क्षत्रिय लढवैय्या वंजारी समाज सज्ज होता. मुळ व्यवसायच भटक्या स्वरुपाचा असल्याने आणि विविध जाती-जमातींशी, अगदी परकिय व्यापा-यांशीही नित्य संपर्ज येत असल्याने वंजा-यांची एक स्वतंत्र व वैशिष्ट्यपुर्ण संस्कृतीही बनत गेली. इतर कोणत्याही समाजापासुन वेगळे पडल्याने एक स्वतंत्र मानसिकता...भटकेपणाची नैसर्गिक उर्मी यातुन त्यांचे स्वत:चे संगीत...काव्यही उमलत गेले. भाषाही वेगळी बनत गेली. हे सारे नैसर्गिक व स्वाभाविक असेच होते. वंजारी तांड्यांचे आकर्षण तत्कालीन कवी/नाटककारांमद्धेही होते. दंडीने त्याच्या दशकुमारचरितात तांड्यांच्या एका थांब्याचे व रात्रीच्या त्यांच्या आनंदी गीतांचे/नृत्यांचे अत्यंत सुंदर वर्णन करुन ठेवले आहे.

Comments

Popular posts from this blog

Shikhar tak pohochne ke liye

 

Required Approvals for Potable Water Systems

Economic Outlook: May 2024  ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ From Pumps & Systems ...

Streamlining Quality Assurance

A Global Look at What to Expect From the Pump Industry in 2024  ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ From Pumps & Systems ...